Uncategorized
भाग 4: युधिष्ठिर
पांडू आणि माता कुंती यांचा पुत्र आणि पाच पंडवांमधील ज्येष्ठ भाऊ जो इंद्रपस्थ आणि पुढे जाऊन हस्तीनापुर(कुरु) चा राजा होता तो युद्धिष्ठीर. नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजूनी उभा असलेला राजा युधिष्ठिर. जीवनभर सत्य बोलण्याचे जणू त्याचे व्रतच होते. धर्मराजा कडून पांडू आणि कुंती ने आशीर्वाद म्हणून प्राप्त केलेल्या या पुत्रा मध्ये सर्व प्रकारचे ज्ञान होते.
असा म्हणतात की पाच पंडवांपैकी देहासोबत स्वर्गामध्ये फक्त युद्धिष्ठिराला जागा मिळाली आणि युद्धाच्या 15व्या दिवशी अश्वत्थामा बदल बोललेल्या अर्ध्या खोट्यासाठी काही काळ नरकात वास केल्याचेही काही पुराणात सांगितले आहे. युद्धिष्ठिराचे शस्त्र हे भाला होते.
एकदा गुरु द्रोण यांनी झाडावरच्या पक्ष्याचा डोळा धनुष्य बाणाने भेदायला सांगितला तेव्हा युद्धिश्ठीर म्हणाला की त्याला पक्षासोबत एक घरटं,एक मुंगळ्यांच वारूळ दिसतंय. याचा अर्थ की जर पक्ष्याचा डोळा भेदला तर तो पक्षी त्या घर्ट्यावर नको पडायला आणि जर झाडाची फांदी तुटली तर ती वारुळावर नको पडायला. तेव्हा गुरु द्रोण यांनी त्याला एक चांगला शासक असा विचार करतो आणि तो युद्धिष्ठीरामधे स्वाभाविक रित्या आहे.
या वरून आपल्याला लक्षात येते की आपल्यात कश्या प्रकारचे विचार असावेत.घरातल्या कर्त्या व्यक्तीने युद्धिष्ठीरासारखे पूर्ण धर्म ज्ञानी नसले तरी चालेल पण कदाचित असा विचार करणारा नक्की असावा. शांत स्वभाव पण सामर्थ्यशील असे लोक फार कमी असतात आजच्या जगात. दृपदासोबतच्या युद्धात बंदी केलेले कौरव कितीही दुष्ट असले तरी आपले भाऊ आहेत म्हणून त्यांना सोडवण्याची वृत्ती युद्धिष्ठीरापासून आपण शिकू शकतो. शिवाय नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.
आपण महाभारत या एका ग्रंथातून किंवा या काव्यातून कितींकाय काय शिकू शकतो. हे महाभारताच युद्ध आपल्याला जीवनाचा संपूर्ण सार देतं. अश्याच अजून काही व्यक्तिरेखा आणि काही प्रसंग जाणून घेऊया पुढच्या काही भागांमध्ये.
- – – यशवंत बाळासाहेब घेवारे.
-
Entertainment6 years agoDisha Patani is a National crush and Why?
-
Paradox recommends6 years agoWAJID KHAN song list forever in heart and on the playlist
-
Interview5 years agoMadhura Joshi Divekar tells us her story, passion and more.
-
Entertainment5 years agoBest bollywood villains of 90s and the iconic actors.
-
Food6 years agoTerrace Farming- A clever way to grow greens.
-
Interview5 years agoTirth Parsana: one who gives a laughter pill
-
Business6 years agoElon Musk : undaunted visionary character shaping our future
-
Paradox recommends6 years agoTop webseries you must watch.
-
Fashion6 years agoSABYASACHI LEHENGA : A dream of every girl.
-
influencer stories5 years agoNeha Kulkarni who does Nasti Uthathev!