Connect with us

Uncategorized

नैसर्गिक आपत्ती : ओला दुष्काळ



पाऊस ही जरी नैसर्गिक आपत्ती असली. तरी या आपत्तीचे मूळ कारण पर्यावरणाचा हास आहे.
नैसर्गिक नियमांचे उल्लंघन, जाणते-अजाणतेपणी केलेल्या चुकांची दीर्घ रांग आहे. सृष्टीमधील असमतोल वाढत आहे.
निसर्ग कोपला तर सुनामी, दुष्काळ,चक्रिवादळ, ढगफुटी, प्रलय यांना सामोरे जावे लागणार.

आपल्या बुद्धीच्या जोरावर मानव जमिनीवरील चढ-उतार ,ओघळी,
ओढेनाले नष्ट करून त्यावर सिमेंटची जंगले निर्माण करू लागला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती पण आता प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र रूम बंगला असावा वाटतोय. त्यातच त्याला खूप मोठेपणा वाटतोय. माणसाचा हव्यास वाढतच चाललाय .
उत्तराखंड मध्ये झालेली ढगफुटी त्या देवभुमीत झालेले तांडव. तेथील लोकांना आलेले चित्तथरारक अनुभव आपण विसरू शकणार नाही. गेल्यावर्षी कोल्हापूर सांगली आणि आता पुणे-सोलापुर जिल्ह्यांना पावसाने हैराण केले आहे . ओढे, नद्या ,धरणे तुडूंब भरली आहेत. आज कित्येक संसार पाण्याखाली आहेत .लोक खूप घाबरलेली आहेत जीव मुठीत धरून प्रत्येक जण निवाऱ्याच्या शोधात आहे. टीव्ही ,मोबाईल यांच्यावर बघणं आणि प्रत्यक्षात अनुभव घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. डोळ्यासमोर माणसे, वाहने वाहत असताना पाहिले. निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे .पावसाने रस्ते वाहून गेले ,जमिनी खचल्या, जुनी बांधकामे पडली, दुकानांमध्ये पाणी शिरले खूप नुकसान होऊन माणूस हतबल ठरला आहे .क्षणात सर्व स्वप्ने पावसापाण्यात गेली . शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास क्षणात नष्ट झाला .वर्षभराची मेहनत एका क्षणात पाण्यात गेली .आता जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि जगलं तर काय खायचं सरकारच्या मदतीची ठिगळ त्यांच्या जगण्याला पूर पडेल का ?दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय हा प्रश्न कोण सोडवेल ?

माणसातलं माणूस पण मदत करतय . शासकीय व्यवस्थापनाला लागलीय. प्रत्येक मदतीचा हात पुढे येणे गरजेचे आहे कारण प्रत्येकावर ही वेळ येणार आहे .स्वार्थी विचार सोडून देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या विरुद्ध जाणार नाही.
हा अनमोल विचार प्रत्येकाने ठरवला पाहिजे.
निसर्गावर करू नका मात प्रलय रूपात तो करेल तुमचा घात.

Continue Reading
1 Comment

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending